आकर्षक व्याजदराचे आमिष दाखवून लाखोंची फसवणूक

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2021 :- आकर्षक व्याजदराचे आमिष दाखवून मुदत ठेवीवरील दोन लाख रुपये परत न देता फसवणूक केल्याप्रकरणी वि. दा. सावरकर मल्टिस्टेट को. सोसायटी शाखा जामखेडच्या मॅनेजिंग डायरेक्टरसह पाचजणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, उमेश विठ्ठल देशमुख (रा. जामखेड) यांनी याबाबत फिर्याद दिली. दोन वर्षांपूर्वी जामखेड शहरात वि. दा. सावरकर मल्टिस्टेटची शाखा सुरू झाली होती. या शाखेत २०१८ सालापासून मुदतठेवीवर आकर्षक व्याजदरासह परतावा देण्याची जाहिरात आली होती.

त्यानंतर उमेश देशमुख यांनी या शाखेत दोन लाख रुपये १३ महिन्यांसाठी मुदतठेव ठेवली होती. त्याची मुदत संपल्यानंतर ते पैसे आणण्यासाठी गेले. ही बँक दिवाळखोरीमध्ये गेल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. वेळोवेळी पैशांची मागणी करूनही संबंधित बँकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून पैसै मिळाले नाहीत, असे देशमुख यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

याप्रकरणी देशमुख यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून याप्रकरणी शाखा व्यवस्थापक वैभव रघुवीर देशमुख, रोखपाल विकास नानासाहेब कुलकर्णी,

लिपिक शेखर प्रमोद वायभट (तिघे रा. जामखेड), व्यवस्थापकीय संचालक प्रमोद बालाजी निमसे, गणेश शंकर थोरात (दोघे रा. केडगाव, नगर) अशा पाच जणांविरोधात जामखेड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24