शेतकर्‍यांची व्यापार्‍याकडून 1 लाखाची फसवणूक

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2020 :-  कबाड कष्ट करून आपल्या जमिनीत सोने पिकवून जगाचे पोट भरणारा बळीराजा आज अडचणीत असून आपल्या हक्काच्या मागणीसाठी आंदोलन करत आहे.

तर दुसरीकडे पैशाची लालच असलेले काही व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे. नुकतेच श्रीरामपूर मधील एका शेतकऱ्याची एका व्यापाऱ्याने फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील शेतकर्‍यांची सोयाबीन खरेदी करून शेतकर्‍यांना तुटपुंजी रक्कम देऊन थोड्या दिवसांनी चेक स्वरूपात आपल्या खात्यातील रक्कम वर्ग करतो असे सांगून शेतकर्‍यांची अंदाजे 1 लाख रुपयांची फसवणूक केली.

याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात एका व्यापार्‍याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडाळा महादेव येथील सागर रावसाहेब पवार व अन्य 15 शेतकर्‍यांकडून ऑक्टोबर 2020 ते नोंव्हेबर 2020 या काळात श्रीरामपूर येथील नवल रमणलाल बोरा या व्यापार्‍याने सुमारे 1 लाखाच्या किंमतीची सोयाबीन खरेदी केली.

या शेतकर्‍यांनी उर्वरित रक्कम मिळत नसल्याने वेळोवेळी व्यापारी नवल रमणलाल बोरा यास संपर्क केला असता आज उद्या नंतर देतो अशी बतावणी बोरा यांनी केली. आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच सर्व शेतकरी यांनी एकत्र येऊन आयपीएस पोलीस अधिकारी आयुष नोपाणी यांना घटनेची माहिती दिली.

त्यावरून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान सुरवाडे यांनी शेतकर्‍यांची भेट घेऊन चौकशी केली.

याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात सागर रावसाहेब पवार या शेतकर्‍याने फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी नवल रमणलाल बोरा या व्यापार्‍याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक समाधान सुरवाडे करत आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24