अहमदनगर Live24 ,1 मे 2020 :- कोपरगाव : सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याच्या ९ हजार ३८८ ऊसउत्पादक सभासदांना कारखान्याने स्वत: उत्पादन केलेल्या संजीवनी हॅँड सॅनिटायझरच्या प्रत्येकी चारप्रमाणे ३७ हजार ५५२ बाटल्यांचे मोफत घरोघर वितरण करण्यात आल्याची माहिती संजिवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी दिली.
याबाबत कोल्हे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, की महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याच्या वतीने सर्वप्रथम जंतुनाशक फवारणी करून मास्क तसेच कोपरगाव नगरपालिका आरोग्य कर्मचाऱ्यांना मोफत सुरक्षा सूट,
११ प्राथमिक आरोग्य केंद्रांसह कोपरगाव ग्रामीण रुग्णालय तसेच खासगी रुग्णालये, सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, काकडी विमानतळ यांना सोडियम हायपोक्लोराइड, मास्क, हातमोजे, फवारणी पंप आदींचे मोफत वितरण करण्यात आले. अशा सेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक यांनाही मोफत सॅनिटायझरचे वाटप केले.
संजीवनी उद्योग समूह व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील सुमारे ३० हजार कुटुंबांना १८० मिली संजीवनी सॅनिटायझर तर कोपरगाव शहरातील १५ हजार कुटुंबीयांना तसेच संजीवनी कारखान्याच्या ९ हजार ऊसउत्पादक,
सभासद कुटुंबे असे मिळून ५५ हजार कुटुंबीयांना मोफत सॅनीटायझरचे वाटप करण्यात आले. लॉकडाऊनच्या काळात घरीच सुरक्षित थांबून आपण आपल्या कुटुंबियांची काळजी घ्या व नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करा, असे आवाहन कोल्हे यांनी केले आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®