अहमदनगर Live24 टीम, 9 जानेवारी 2021 :- सिद्धार्थनगर येथे महाराष्ट्र पोलिस स्थापना दिनाच्या निमित्ताने सामाजिक समता विचारधारा फौंडेशन अहमदनगर, तोफखाना पोलिस स्टेशन आणि आनंदऋषीजी नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
प्रमुख पाहुणे तोफखाना पोलिस स्टेशनचे पो.नि.सुनिल गायकवाड होते. यावेळी माजी नगरसेवक अनिल शेकटकर, सामाजिक कार्यकर्ते सुनिल सकट, संस्थेचे अध्यक्ष श्री सुनिल मुरलीधर भोसले आदि उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली.
याप्रसंगी पो.नि.सुनिल गायकवाड म्हणाले, सध्या कोरोनामुळे सर्वच क्षेत्राला त्याची झळ पोहचली आहे. अनेकांच्या नोकरी, व्यवसाय गेल्याने आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत सामाजिक समाता विचारधारा फौंडेशनच्यावतीने गरजूंसाठी मोफत नेत्र तपासणीचा राबविलेला उपक्रम त्यांना दिलासा देणार आहे. अशा उपक्रमातून सामाजिक समता निर्माण होत असते.
गरजवंतांना सेवा देऊन आपण समाजाप्रती आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. प्रास्ताविकात संस्थेचे अध्यक्ष सुनिल मुरलीधर भोसले म्हणाले, फौंडेशनच्यावतीने वेळोवेळी अनेक सामाजिक उपक्रमांद्वारे गरजूंसाठी उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असते.
कोरोनानंतर आरोग्याच्या अनेक समस्या उभ्या राहिल्या आहेत. मोफत तपासणी शिबीराच्या माध्यमातून गरजूंना त्यांचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यासाठी अनेकांचे सहकार्य मिळत असते. फौंडेशनच्यावतीने असे उपक्रम नेहमीच राबवू, असे सांगितले याप्रसंगी सिद्धार्थनगर येथील सफाई कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, शाळकरी मुलांच्याही तपासणी करण्यात आली.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी विभीषण चव्हाण, मंगल काटकर, सिद्धेश वैराळ, कैलास जगधने, मारूती ससाणे, अनिल मांडलिक , गणेश शेकटकर, सावित्राबाई भोसले, श्रेया घोरपडे, सुहानी भोसले, शितल घोरपडे, श्रृती घोरपडे, यांनी परिश्रम घेतले.