मुळव्याध व्याधीवर मोफत तपासणी शिबीर

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2021 :- सांगताही येत नाही, सहनही होत नाही, अशा आजारांमध्ये मोडणारा मुळव्याध हा अग्रस्थानी आहे. या आजारात रुग्णांना असह्य वेदना सहन कराव्या लागतात.

या आजारातून मुक्त होण्यासाठी अनेक पथ्ये पाळावे लागतात. अशा या आजारावर ओम क्लिनिकतर्फे मोफत तपासणी शिबिराचे आयोजन शुक्रवार, दि. १५ व शनिवार, दि. १६ जानेवारी २०२१ रोजी, सुपेकर मेडिकलच्यावर, दिल्लीगेट, अहमदनगर येथे डॉ. गायत्री लबडे व डॉ. दर्शन पवार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले आहे.p

तरी या शिबिरात रुग्णांनी नाव नोंदणीसाठी संपर्क ९१६०५८५८४७, ९५१८३८८३४४ करणे आवश्यक आहे. या मोफत शिबिराचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घेण्याचे आवाहन डॉ. गायत्री लबडे यांनी केले.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24