अहमदनगर Live24 टीम, 03 फेब्रुवारी 2021:- काँग्रेस प्रदेशाध्यक्ष महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने मोफत शिवभोजन थाळीचा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या उपक्रमाचा शुभारंभ काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या शुभहस्ते रेल्वे स्टेशन समोरील श्री दत्त हॉटेल शिवभोजन थाळी केंद्र या ठिकाणी झाला. यावेळी ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष मनोज गुंदेचा, केंद्राचे संचालक दत्ताशेठ गायकवाड, शहर जिल्हा उपाध्यक्ष खलिल सय्यद, निजामभाई जहागीरदार,
अनंतराव गारदे, आयिंदी शहा, अल्पसंख्याक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष अज्जूभाई शेख, अनिसभाई चुडीवाल, क्रीडा काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रवीणभैय्या गीते पाटील,सेवादल काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ.मनोज लोंढे, शहर जिल्हा सचिव प्रशांत वाघ, सहसचिव नीता बर्वे, खजिनदार मोहनराव वाखुरे यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना किरण काळे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारने सत्तेवर आल्यानंतर राज्यातील गोरगरीब जनतेसाठी शिवभोजन थाळी योजना सुरू केली. योजना सुरु झाल्यापासून आजपर्यंत राज्यातील लाखो सर्वसामान्य लोकांना या योजनेचा लाभ मिळाला आहे.
नगर शहरामध्ये देखील ही योजना चांगल्या पद्धतीने राबवली जात आहे.शासनाची ही योजना कौतुकास्पद आहे. ना.बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त नगर शहरातील श्री दत्त हॉटेल शिवभोजन केंद्रावरील येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना एक दिवसासाठी मोफत भोजन दिले जात आहे.
यासाठी केंद्राचे संचालक आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दत्ताशेठ गायकवाड यांनी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार काळे यांनी काढले आहेत. काळे पुढे म्हणाले की, दत्ताशेठ गायकवाड हे रेल्वे स्टेशन परिसर त्याचबरोबर केडगाव भागातील नागरिकांसाठी सातत्याने काम करणारे नेते आहेत.
त्यांचा समाजातील विविध घटकांशी असणारा सामाजिक सलोखा हा काँग्रेस पक्षाची ताकद आहे. येणाऱ्या काळात त्यांना काँग्रेसचे अधिक बळ देण्याचे काम पक्षाच्या वतीने निश्चितपणे केले जाईल. दत्ताशेठ गायकवाड यावेळी बोलताना म्हणाले की, ना.बाळासाहेब थोरात हे सुसंस्कृत नेतृत्व असून त्यांनी किरण काळे यांच्या माध्यमातून नगर शहराला तरुण,
निर्भिड, सुसंस्कृत नेतृत्व दिले आहे. आमच्यासारख्या काँग्रेसच्या जुन्या कार्यकर्त्यांना यामुळे संजीवनी मिळाली असून आगामी काळात स्टेशन रोड, केडगाव परिसरामध्ये काँग्रेसची पाळेमुळे अधिक घट्ट करण्यासाठी प्रयत्न केला जाईल.
यावेळी महिला सेवादल शहर जिल्हाध्यक्ष कौसर खान, अनिसभाई चुडीवाल, निसार बागवान, युवक काँग्रेस अध्यक्ष ॲड. अक्षय कुलट, सहसचिव गणेश आपरे, शरीफ सय्यद, इम्रान बागवान, अजय मिसाळ, संजय भिंगारदिवे, श्यामवेल तिजोरे आदींसह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.