अहमदनगर Live24 ,5 मे 2020 :- न्यायालयीन कोठडीत असलेला दरोड्याच्या तयारीतील दोन आरोपींची कारागृहातच फ्रीस्टाईल झाली. राहुरी सबजेलमध्ये ही घटना घडली.
याबाबत माहिती अशी की, महेश चंद्रकांत निमसे (वय 24 वर्षे रा . टाकळीमियाँ, ता . राहुरी, सध्या सबजेल राहुरी ता . राहुरी ) व बंटी ऊर्फ अनिल विजय आव्हाड (रा . टाकळीमिया, ता . राहुरी, हल्ली बॅरेक नं . 3 सबजेल राहुरी, ता. राहुरी) हे दोघे राहुरी पोस्टे गुन्हा रजि . नं . 844 / 2019 भा . दं . वि . क . 399 , 402 मध्ये अटक आहेत.
ते सध्या मॅजि . कस्टडीमध्ये असून, ते बँरेक नं . 3 मध्ये सबजेल राहुरी येथे आहे. महेश हा बंटीला म्हणाला की, ‘मी तुझ्यामुळे गुन्हात फसलो आहे. माझ्या जामिनाची व्यवस्था कर. माझ्या पाठीमागे कोणी नाही.
त्यावर ‘आम्ही काय तुझ्या जामिनाची हमी घेतली नाही’, असे म्हणून बंटीने महेशचा गळा आवळून शिवीगाळ करुन लाथाबुक्कानी मारहाण केली. तोंडावर हाताचा बुक्का मारुन दोन दात पाडून दुखापत केली आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®