अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2021:- अहमदनगर : आपल्या भारतीय संस्कृतीत नातेसंबंधाला खूप आहे. त्यातल्या त्यात मित्रत्वाच्या नात्याला तर अत्यंत पवित्र व विशेष मानले जाते. मैत्रीचे नाते बंधुत्वाचे व अतुट असते मात्र याच नात्याला कलंक लावल्याचा प्रकार राहाता तालुक्यात घडला आहे.
राहाता तालुक्यातील लोणीमध्ये इरिगेशन कॅनलच्या परिसरात कच्चा एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. त्याच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आला होता.
या घटनेची लोणी पोलीस स्टेशनला माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाची चक्रे फिरवली असता हा मृतदेह अर्जुन अनिल पवार (वय २५, रा बारागाव नांदूर ता.राहुरी) याचा असल्याचे निष्पन्न झाले आहे.
डोक्यात दगड घालून पवार याचा खून झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणात पोलिसांनी अर्जुन पवार याचे मित्र दीपक डोळस व विठ्ठल कावळे यांना ताब्यात घेतले असून या दोघा आरोपींनी अर्जुन पवार याच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची कबुली दिली आहे.
मात्र खून करण्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. संबंधितांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून, याबाबत अधिक तपास लोणी पोलिस स्टेशनचे समाधान पाटील करत आहेत.