अल्पवयीन मुलीशी मैत्री व नंतर प्रेमसंबंध, लग्नाचे आमिष दाखवून….

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2020 :- अकोले तालुक्यात इयत्ता ११ वीत शिकत असलेल्या अल्पवयीन मुलीशी मैत्री व नंतर प्रेमसंबंध निर्माण करून लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याची घटना गर्दणी येथील खानापूर शिवारातील घडली.

अकोल्यात महिला अत्याचाराची पंधरा दिवसांत घडलेली ही चाैथी घटना आहे. आठ दिवसांपूर्वीच ब्राह्मणवाडा येथे मतिमंद युवतीवरील व मुथाळणे येथे अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या घटना ताज्या असतानाच

गर्दणीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची ही घटना घडली. पीडित अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी अकोले पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे,

२६ ऑगस्टला रात्री १२ ते २९ ऑगस्टला दुपारी १२ दरम्यान व त्यापूर्वी एक वर्षापासून रामदास कृष्णा खडके याने आपली मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असताना

तिच्याशी मैत्री व नंतर प्रेमसंबंध निर्माण करून लग्नाचे आमिष दाखवून तिला घरून घेऊन जाऊन वारंवार लैंगिक अत्याचार केले. पोलिसांनी पोक्सो व अन्य गुन्हे दाखल करुन आरोपीस गजाआड केले.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24