अहमदनगर Live24 टीम,27 ऑक्टोबर 2020 :- शेती नावावर करून देण्याच्या वादातून एकावर थेट तलवारीने वार केल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यातील चिखली गावच्या शिवारात रविवार दि.२५ ऑक्टोबर रोजी घडली.
नाना पांडुरंग झेंडे असे या हल्ल्यात जखमी झालेल्याचे नाव आहे. याबाबत सविस्तर असे की, शेती नावावर करण्याच्या कारणातून नाना पांडुरंग झेंडे यांना सागर नारायण झेंडे व एक अनोळखी व्यक्तीने श्रीगोंदा तालुक्यातील चिखली गावच्या शिवरात बोलावून घेतले.
मात्र येथे त्यांच्यात वाद होवून नाना झेंडे यांना सागर झेंडे याने शिवीगाळ करून त्यांच्यावर तलवारीने डोक्यावर, हातावर,पायावर, तोंडावर वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.
तसेच सोबत असलेल्या दुसऱ्या अनोळखी इसमाने लाथाबुक्याने मारहाण केली.याबाबत पांडुरंग मधुकर झेंडे यांनी बेलवंडी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून वरील दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून,याबाबत अधिक तपास पोसई बोराडे हे करत आहेत.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved