अहमदनगर बातम्या

अरुंद पुलावरून मालवाहू कंटेनर थेट ओढ्यात उलटला

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 30 सप्टेंबर 2021 :- संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील एका अरुंद पुलावरून एक मालवाहू कंटेनर थेट ओढ्यात उलटून अपघातग्रस्त झाल्याची घटना घडली आहे.

या अपघातात चालक मधुकर कांबळे हवे किरकोळ जखमी झाले आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि , लोणी ते नांदूरशिंगोटे या तळेगाव दिघेमार्गे असलेल्या डांबरी रस्त्याने चालक मधुकर कांबळे हे मालवाहू कंटेनरमध्ये माल घेऊन प्रवास करत होते.

यावेळी भरधाव वेगाने जाणारा हा कंटेनर तळेगाव दिघे बाजार तळानजीकच्या अरुंद पुलावरून तीन पलट्या खात उलटून ओढ्यात अपघातग्रस्त झाला.

या अपघाताच्या घटनेची माहिती मिळताच परिसरातील काहीजण मदतीसाठी तातडीने धावले व त्यांनी मदतकार्य सुरु केले. दरम्यान या अपघातात मालवाहू कंटेनरचे मोठे नुकसान झाले.

बाजार तळानजीकच्या अपघाती वळण रस्त्याचे व अपघाती अरुंद पुलाचे त्वरित रुंदीकरण करावे, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.

Ahmednagarlive24 Office