अहमदनगर Live24 टीम,21 जुलै 2020 :- श्रीरामपूर तालुक्यातील कमालपूर येथील अट्टल गुन्हेगार बऱ्याच दिवसांपासून फरार होता. काल पोलिसांनी त्याला सापळा लावून जेरबंद केले.त्याच्याकडून एक +व दोन काडतुसे हस्तगत करण्यात आली.
बबलू मोहन चव्हाण असे आरोपीचे नाव असून अनेक ठिकाणी घरफोड्या करण्याच्या गुन्ह्यात तो पोलिसांना हवा होता. श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक श्रीहरी बहिरट व इतर कर्मचारी सोमवारी दुपारी फरार आरोपीच्या शोधात असताना
चव्हाण आपल्या नातेवाईकांकडे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस पथकाने वडाळाफाटा येथे सापळा लावून चव्हाणला एका विनानंबरच्या मोटारसायकलसह ताब्यात घेतले.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा
ahmednagarlive24@gmail.com