अहमदनगर Live24 टीम, 30 ऑक्टोबर 2021 :- एकीकडे जनता अनेक समस्यात असताना दुसरीकडे श्रीगोंदा पंचायत समितीच्या मासिक सभेत १५ व्या वित्त आयोगातील सुमारे १ कोटी ७५ लाख रुपयांच्या अखर्चित निधीवरून सदस्यांनी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेत,
येत्या आठ दिवसांत सदस्यांचा निधी खर्च करण्याबाबत आराखडा तयार करत निधी खर्च केला नाही तर पंचायत समिती कार्यालयाला टाळे ठोकून अधिकाऱ्यांना चौकात उभे करत सदस्य धरणे आंदोलन करण्याचा इशारा माजी सभापती पुरूषोत्तम लगड यांनी दिला.
श्रीगोंदा पंचायत समितीच्या माध्यमातून विविध विकास कामासाठी मंजूर झालेले १ कोटी ७५ लाख रुपयांपैकी प्रत्येक सदस्यासाठी २० लाख रुपये निधी मंजूर होऊन देखील संबधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अनास्थेमुळे आराखडा तयार करून देखील निधी खर्च झाला नाही.
या आरखड्यामधील १५ कामे पूर्ण झाले आहे मात्र त्याचे बिल अदा केले नाही. मागील अडीच वर्षांपासून एकही काम पूर्ण झाला नसल्याने अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षाने शेतकरी रोजगार हमीच्या कामाला मुकले आहेत.
सदस्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत त्यांची झाडाझडती घेतली. गटविकास अधिकारी गोरख शेलार यांनी पुढील सोमवार पर्यंत सर्व प्रकरणांचा निपटारा करून पूर्ण झालेल्या कामांची बिले अदा करणार असल्याची हमी दिली.
तसेच येत्या आठ दिवसांत सदस्यांचा निधी खर्च करण्याबाबत आराखडा तयार करत निधी खर्च केला नाही तर सर्व पंचायत समिती कार्यालयाला टाळे ठोकून अधिकाऱ्यांना चौकात उभे करत सर्व पंचायत समिती सदस्य धरणे आंदोलन करण्याचा इशारा माजी सभापती पुरूषोत्तम लगड यांनी दिला.