अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2021 :-भविष्यात नगरमध्ये चांगले कामे उभी राहतील. यासाठी आपण प्रयत्नशील आहे. नगर शहराच्या विकासासाठी शासनाकडे निधीसाठी पाठपुरावा सुरु आहे. शहरातील अनेक भागात कामे सुरु आहेत.
या कामांमधून शहरातील प्रलंबित कामांना चालना मिळणार आहे, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. प्रभाग क्र. ११ मधील कोंबडीवाला मळा येथील ड्रेनेज लाइन कामाचा शुभारंभ आमदार जगताप यांच्या हस्ते झाला.
याप्रसंगी नगरसेवक अविनाश घुले, प्रा.बेदारकर, डॅनियल पाटोळे, कर्नल फ्रान्सिस, किसन भिंगारदिवे, रामदास नायडू, मोहन साबळे, बाळू भिंगारदिवे, अंतोन पिल्ले, संजय आल्हाट, राकेश पाटोळे, किरण साबळे,
सचिन पवार, प्रतिक घोडके, भारत सोले उपस्थित होते. घुले म्हणाले, कोंबडीवाला मळा परिसरात लोकवस्ती वाढत आहे, . यासाठी प्रत्येक भागातील समस्यांचा विचार करुन आवश्यक सुविधांना प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहोत.