‘ह्या’ मंत्र्यांच्या प्रयत्नातून राहुरीला निधी’

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2020 :-  राहुरी नगरपालिकेच्या माध्यमातून शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी विविध प्रयत्न सुरु आहेत. मंत्री तनपुरे यांच्या प्रयत्नातून नगरपरिषदेसाठी अनेक विकास कामांसाठी भरघोस निधी मंजूर करण्याचे काम होत आहे.

मंत्री तनपुरे यांनी राहुरीसाठी चांगला निधी दिला. यातून राहुरीच्या विकास होईल असा विश्वास राहुरी नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षा राधा साळवे यांनी व्यक्त केला.

शहरातील 16 लक्ष रुपये किंमतीच्या अंतर्गत पाईप गटारीच्या कामाचा शुभारंभ त्यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, मतदारसंघातील इतर कामांमुळे तनपुरे यांच्यावरील जबाबदारी वाढलेली आहे.

त्यांचे पाठबळ व ज्येष्ठनेते माजी खासदार प्रसाद तनपुरे, अरुण तनपुरे, डॉ. सौ. उषाताई तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर विकासाची घोडदौड सुरूच राहील.

दरम्यान, जिल्ह्यात कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. ग्रामीण भागातील अनेक तालुके आता कोरोना आपल्या विळख्यात घेत आहे.

राहुरी तालुक्यातील अनेक गावात कोरोनाचे रुग्ण आहेत. अनेकांचे बळीही कोरोनाने घेतले आहेत. याविरुद्ध लढण्यासाठीही नगरपालिका सर्वतोपरी प्रयत्नशील आहे.

 

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24