Ahmednagar News : महाविकास आघाडी सरकार असताना मतदार संघात कोणत्याही प्रकारचा निधी आणता आला नाही. पंरतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकार सत्तेवर आल्यानंतर मतदार संघात मोठ्या प्रमाणात निधी आणता आला.
त्यामुळे मतदार संघातील प्रत्येक गावात निधी देण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती महायुतीचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांनी दिली.
नेवासा तालुक्यातील गावांमध्ये प्रचार दौऱ्यावेळी बोलत होते. नेवासा तालुक्यातील पाचेगाव, नेवासा बु., नेवासा फाटा, भानसहिवरे, भेंडा, कुक ाणा, देडगाव, माका, चांदा, घोडेगाव आदी गावांमध्ये त्यांनी काल भेटी दिल्या.
खा. लोखंडे म्हणाले, प्रत्येक वर्षी खासदार निधी हा फक्त पाच कोटी मिळतो. प्रत्येक विधानसभेच्या वाट्याला फक्त ८० लाख रुपये येतात. सध्याच्या स्थितीत एक किलोमीटर रस्ता फक्त खडीकरण करायचा म्हटला तरी दहा लाख रुपये लागतात.
या ८० लाखात कोणत्याही प्रकराचे मोठे काम उभे राहणार नाही. कोणताही खासदार निवडणून आला तरी हे कामे करू शकतो. मात्र या पाच कोटींच्या पलीकडे जाऊन विविध योजनांचा जेव्हा निधी आणला जातो तेव्हा खऱ्या अर्थाने कामे होतात, असे ते म्हणाले.
यावेळी अनेक गावांमध्ये खासदार लोखंडे यांचे स्वागत करण्यात आले. मतदारांचा प्रतिसाद मिळत असल्याचेही यावेळी पहायला मिळाले. यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख बाळासाहेब पवार, जिल्हा उपप्रमुख भगवान गंगावणे, तालुका प्रमुख सुरेशराव डीके, संजय पवार, जेष्ठ विधी तज्ञ अॅड.के.एच. वाखुरे, भाऊसाहेब वाघ, शहर प्रमुख बाबा कांगुणे, महिला आघाडीच्या तालुका प्रमुख मीराताई गुंजाळ, युवा सेनेचे शुभम उगले, संपर्क प्रमुख बापूसाहेब दारकुंडे,
प्रकाश निपुंगे, अंबादास रोडे, उपतालुका प्रमुख भारत चौगुले, बंडू शिंदे, भाजपचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब फुलारी, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भीमराज शेंडे, ‘रासप’चे तालुकाध्यक्ष गोरख होडगर, मनसेचे तालुकाध्यक्ष दिगंबर पवार, आरपीआयचे तालुकाध्यक्ष सुशील धायजे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
समन्यायी पाणी वाटप कायद्यामुळे गोदावरी, मुळा व प्रवरा पट्ट्यात पाणी कमी झाले आहे. ते वाढवण्याची गरज असून त्यासाठी घाटमाथ्याच्या पाण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. पहिल्या टप्यात सर्वेक्षणाला मंजूरी मिळाली असल्याचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी सांगितले.