अहमदनगर बातम्या

वनशहीद किनकर यांच्यावर शासकीय इतमातात अंत्यसंस्कार

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2021 :-  श्रीरामपूर येथे भरवस्तीत धुमाकूळ घालून अनेकांना जखमी करणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी अतोनात प्रयत्न करताना जखमी झालेले राहुरी येथील वन कर्मचारी लक्ष्मण गणपत किनकर उपचारादरम्यान मृत पावले.

ताहाराबाद येथे वनशहीद किनकर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमातात अंत्यसंस्कार करण्यात आले. साश्रु नयनांनी शहीद वनरक्षक किनकर यांना अखेरचा निरोप देण्यात आला.

रविवारी श्रीरामपुर शहरात घुसलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाकडून पथक नेमण्यात आले होते. या पथकात किनकर यांना नेमण्यात आले होते.

याच वेळी बिबट्याच्या पंजाची नखे दोन इंचापर्यंत किनकर यांच्या मांडीला घुसल्याने किनकर गँभीर जखमी झाले. त्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते.

मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने व ब्लड प्रेशर कमी झाल्याने बुधवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. ताहारावाद येथे बुधवारी दुपारी वनशहीद लक्ष्मण किनकर यांच्या पार्थिवावर राष्ट्रध्वज ठेवण्यात आला.

सहा पोलिसांनी गार्ड ऑफ ऑनर दिला. यावेळी पोलीस उपअधीक्षक संदिप मिटके, पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे, नाशिक मंडळाचे मुख्य वनरक्षक नितीन गुदगे, नगरच्या उप वनसंरक्षक सुवर्णा माने,

सहायक वनरक्षक रमेश देवखिळे, राहुरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी भगवानसिंह परदेशी, वनपाल सचिन गायकवाड, कैलास रोकडे, पवन निकम तसेच सामाजिक,

राजकीय क्षेत्रातील मंडळी उपस्थित होते. शहिद वनरक्षक किनकर यांच्या मागे वडील, पत्नी, दोन मुले,दोन मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office