भाजप नेते दिलीप गांधी यांच्या आठवणीने गडकरी भावूक …

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 02 ऑक्टोबर 2021 :-  मंत्री नितीन गडकरी यांनी जिल्ह्यातील महामार्गाच्या अनेक कामांना मंजूरी दिल्यानंतर आता प्रत्यक्ष कामांनाही सुरूवात होत आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सहा प्रकल्पांचे भूमिपूजन आणि पाच रस्त्यांचे लोकापर्ण ​सोहळा पार पडला.

या कार्यक्रमाला नितीन गडकरी, शरद पवार, मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री प्राजक्त तनपुरे, खासदार सुजय विखे, खासदार सदाशिवराव लोखंडे, आमदार रोहित पवार, माजी मंत्री बबनराव पाचपुते, माजी मंत्री राम शिंदे उपस्थित होते.

आज नगरमध्ये विकास कामांचं भूमिपूजन केलं. तसेच नव्या कामांची घोषणाही केली. या घोषणा करताना दिवंगत भाजप नेते दिलीप गांधी यांच्या आठवणीने गडकरी भावूक झाले.

आज मी ज्या कामांच्या घोषणा करत आहे, त्यासाठी दिलीप गांधी सातत्याने पाठपुरावा करत होते, असं नितीन गडकरी म्हणाले.

यावेळी गडकरी भावूक झाले होते. नितीन गडकरी हे नगरमध्ये जाहीरसभेत बोलत होते. यावेळी त्यांनी दिलीप गांधी यांच्या आठवणींना उजाळा दिला.

मला दिलीप गांधींची आज खूप आठवण येते.अनेक वर्ष आम्ही एकमेकांसोबत काम केलं. त्यांच्या घरीही जाणार आहे.

या सर्व कामांचा ते व्यक्तिगत पाठपुरावा करत होते. ते आज आपल्यात नाही, याचा व्यक्तिगत मला दु:ख आहे, असं गडकरी म्हणाले.