भक्तिमय वातावरणात श्री विशाल गणेश मंदिरात गणेश जयंती साजरी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, , 04 फेब्रुवारी 2022 :- श्री विशाल गणेश मंदिरात श्री गणेश जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या गणेश यागाची आज सांगता झाली.

पुजारी संगमनाथ महाराज यांनी विधीवत पुजा केली. गणेश यागचे यजमानपद उद्योजक विजयकुमार बोरुडे यांनी स्वीकारले होते. पौरोहित्य नाशिक येथील मुकुंद शास्त्री मुळे यांनी केले.

भाविकांनी पहाटेपासूनच मंदिरात दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. गणेश जयंतीनिमित्त मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.

आज सकाळी अभिषेक, महापुजा करुन दुपारी गणेश जन्मावेळी उद्योजक विजयकुमार बोरुडे परिवाराच्या हस्ते आरती करण्यात आली.

यावेळी भाविकांनी पुष्पवृष्टी करुन गणेश जन्मोत्सव साजरा केला. जन्मोत्सवप्रसंगी जिल्हा कारागृह अधिक्षक शामकांत शेडगे, माजी महापौर सुरेखा कदम,

देवस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड.अभय आगरकर, उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे, सचिव अशोकराव कानडे, विश्वस्त विजय कोथिंबीरे, पांडूरंग नन्नवरे, हरिश्चंद्र गिरमे,

भाऊसाहेब फुलसौंदर, चंद्रकांत फुलारी, बापूसाहेब एकाडे, ज्ञानेश्वर रासकर, रंगनाथ फुलसौंदर, गजानन ससाणे आदि उपस्थित होते.