गणेश विसर्जन दोन किंवा तीन लोकांनीच करावे…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,19 ऑगस्ट 2020 :-  ज्येष्ठ नेते माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाबासाहेब भोस यांनी एक गाव एक गणपती असा गणेशोत्सव साजरा करण्यात यावा त्यासाठी श्रीगोंदे शहरात देखील श्री संत शेख महंमद महाराज पटांगणात एक गणपती बसवावा असे आवाहन केले.

त्यानुसार सर्व गणेश मंडळांनी या आवाहनाला मान्यता देत एक गाव एक गणपती उपक्रम राबवण्याचे सर्वानुमते संमती दिली.

येथील तहसील कार्यालयात मंगळवारी गणेशोत्सव व मोहरम निमित्त शहरातील सर्व गणेश मंडळे व मुस्लिम बांधवांची शांतता बैठक नायब तहसीलदार सायली नांदे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.

त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. सार्वजनिक ठिकाणी गणेश मंडळांनी कोरोना विषाणूचे सर्व नियम पाळून गणेशोत्सव व मोहरम सण साध्या प्रमाणात साजरा करावा.

ज्या मंडळांना गणेशमूर्ती बसवायची त्यांनी चार लोकांपेक्षा जास्त गर्दी त्या ठिकाणी जमा होणार नाही याची काळजी घ्यावी. गणेश मूर्ती चार फुटांपेक्षा जास्त उंचीची बसवू नये, आगमन, विसर्जन मिरवणुकीवर बंदी राहील,

गणेशोत्सवातील सर्व कार्यक्रम बंद राहणार, गणेश विसर्जन दोन किंवा तीन लोकांनीच करावे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल,

तसेच श्रीगोंदे शहरात एक गाव एक गणपती बसवण्याची सूचनाही पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी आयोजित शांतता कमिटीच्या बैठकीत केली माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे म्हणाले,

गणेशोत्सव व मोहरम हे सण कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी साध्या पद्धतीने साजरे करावे, त्यासाठी नगरपालिकेतर्फे सर्व सहकार्य करण्यात आले.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24