अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2020 :- कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मनपाने १७ ठिकाणी गणेश विसर्जनाची व्यवस्था केली आहे. गर्दी रोखण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत. उत्सवाची सांगता १ सप्टेंबरला आहे.
मिरवणुका काढल्यास गर्दी होऊन कोरोनाचा फैलाव होण्याची शक्यता आहे, तसेच कलम १४४चे उल्लंघन होण्याचीही शक्यता असल्याकडे मनपाने गणेशभक्तांचे लक्ष वेधले आहे.
शहरातील १७ प्रभागांत गणेश विसर्जन व्यवस्था करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. बोल्हेगाव, गांधीनगर रोड, भारत बेकरी चाैक, सावेडी, वडगाव गुप्ता रस्ता, मयूर काॅर्नर चाैकातील जागा, भिस्तबाग, तपोवन रोड येथील नाना चाैक,
निर्मलनगर भागात साईबाबा मंदिराजवळील खुली जागा, यशोदानगरची विहीर, बालिकाश्रम रस्त्यावरील महालक्ष्मी उद्यानाजवळील जागा, गंगा उद्यान, बाळाजी बुवा विहीर,
सीना नदीपात्र, सारसनगर भागातील भिंगार नाल्याजवळची जागा, लोखंडी पुलाशेजारी सीनानदी पात्रातील जागा, केडगाव येथील क्रांती चाैक, बुद्धविहाराशेजारील खुली जागा, केडगाव देवी मंदिरासमोरील परिसर या ठिकाणी विसर्जन कुंडांची व्यवस्था करण्यात आली आहे
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved