अहमदनगर Live24 टीम,17 जुलै 2020 :- गुन्हेगारांचा कर्दनकाळ समजल्या जाणाऱ्या अहमदनगर एलसीबी अर्थात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दरोडेखोरांच्या टोळीला जेरबंद करण्यात यश मिळविलंय.
एलसीबीचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पाथर्डीत ही कारवाई केली. या कारवाईत सात दरोडेखोरांना अटक करण्यात आली.
या प्रकरणी आसाराम पांडुरंग घुले [वय -६१ रा. हनुमान टाकळी ता. पाथर्डी] यांनी फिर्याद दिली. घुले आणि त्यांची पत्नी पाथर्डी तालुक्यातल्या हनुमान टाकळी येथे त्यांच्या राहत्या घरी दरवाजाचे कुलुप लावुन पडवीत झोपले होते.
त्यावेळी ६ ते ७ अज्ञात दरोडेखोरांनी दरोडा टाकून घुले यांच्या उशाला ठेवलेली चावी घेत कुलुप उघडुन घरातील पत्रापेटी आणि सुटकेस वस्तीच्या थोडया अंतरावर नेली.
घुले यांच्या पत्नीच्या गळयातील मंगळसूत्र बळजबरीने हिसकावून घेऊन जात असताना फिर्यादीने घुले यांनी पाठलाग केला. मात्र दरोडेखोरांनी सत्तूरसारख्या धारदार शस्त्राने मारण्याचा प्रयत्न केला.
त्याचप्रमाणे साक्षीदारांवर दगडफेक करून प्राणघातक हल्ला केला. दरम्यान, याप्रकरणी देण्यात आलेल्या फिर्यादीनुसार पाथर्डी पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३९५, ३९७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, या गुन्हयाचे गांर्भीय लक्षात जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक सागर पाटील,
शेवगांवचे उपविभागीय पोलीस अधीकारी मंदार जवळे यांनी घटनास्थळी भेट देऊन सदर ठिकाणी असलेल्या प्रथमदर्शनी साक्षीदारांकडे विचारपूस केली.
यावेळी फॉरेन्सिक टीम, डॉग स्कॉडकडून घटनास्थळाची पाहणी करण्यात आली. या कारवाईत स्था.गु.शा.चे पोलीस निरीक्षक दिलीप पवार, सपोनि शिशीरकुमार देशमुख, पोहेकॉ सुनिल चव्हाण,
पो. ना. दिनेश मोरे, विश्वासा बेरड, पो. ना. भागीनाथ पंचमुख, विशाल दळवी, रविंद्र कर्डिले, संतोष लोंढे, दिपक शिंदे, पो. कॉ. रणजित जाधव, कमलेश पाथरुट, विजय धनेधर, योगेश सातपुते,
विनोद मासाळकर, शिवाजी ढाकणे, सागर ससाणे, रविंद्र चुंगासे, चालक पोहेकॉ बाळासाहेब भोपळे, चालक पोकॉ शिंदे यांच्या पथकाने भाग घेतला.
पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली, की सदरचा गुन्हा हा अंतापूर [ता. गंगापूर जि. औरंगाबाद] येथील दरोडेखोरांनी केला असून गुन्हेगार अंतापूर गावच्या काटवनात लपून बसले आहेत.
त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला असता दगडू मुबाराक ऊर्फ अण्णा भोसले [वय -२३ रा. अंतापूर. ता. गंगापूर जि. औरंगाबाद], दर्या बरांडया भोसले [वय -२१ रा.अंतापूर.ता.गंगापूर जि.औरंगाबाद],
गुंडया डिस्चार्ज काळे [वय -१ ९ रा. अंतापूर ता. गंगापूर जि. औरंगाबाद] आवान भूर्रम काळे [वय -२२ रा. पाथर्डी जि. अ. नगर,
आकाश उर्फ टाकसाहेब छगन काळे [वय -१ ९ रा.अंतापूर.ता.गंगापूर जि.औरंगाबाद], विशाल दारसिंग भोसले [रा.अंतापूर.ता .गंगापूर जि.औरंगाबाद], कुलत्या बंडया भोसले
[वय -२० रा.बाभरगांव.ता.गंगापूर जि.औरंगाबाद] या दरोडेखोरांना अटक करण्यात आली. दरम्यान, तीतास खंडू काळे [रा.बोल्हेगांव ता.गंगापूर], बेग महादू भोसले [रा.अंतापूर.ता.गंगापूर जि. औरंगाबाद],
रवी अण्णा भोसले [रा. आणतापुर.ता. गंगापूर जि. औरंगाबाद आणि बॉबी संतोष काळे [रा. अंतापूर ता. गंगापूर जि. औरंगाबाद] हे फरार झाले.
या गुन्ह्यात वापरलेल्या हिरो होंडा कंपनीची शाईन, पॅशन ही दुचाकी वाहने जप्त करण्यात आली. दरम्यान, या गुन्हेगारांविरुद्ध विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.
या धडाकेबाज कारवाईबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांनी एलसीबीचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com