अहमदनगर बातम्या

देवळालीतील एका घरात ५८ हजारांचा गांजा जप्त

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : अहमदनगर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व राहुरी पोलिसांच्या पथकाने दि. २१ मार्च २०२४ रोजी दुपारच्या सुमारास संयुक्त कारवाई करत राहुरी तालूक्यातील देवळाली प्रवरा येथे एका घरात छापा टाकला.

यावेळी पथकाने ५८ हजार रुपए किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त करून एकाला ताब्यात घेऊन गजाआड केले.

याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, की अहमदनगर येथील स्थानिक अन्वेषण विभागातील पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या आदेशानुसार पोलिस पथक दि. २१ मार्च २०२४ रोजी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास राहुरी येथे गस्त घालत असताना गप्त खबऱ्यामार्फत माहिती मिळाली तेव्हा स्थानिक अन्वेषण विभागातील पोलिस उपनिरीक्षक तुषार धाकराव,

पोलिस नाईक संतोष खैरे, हवालदार रणजित जाधव, किशोर शिरसाठ, महिला पोलिस हवालदार भाग्यश्री भिटे, चालक अरुण मोरे, तसेच राहुरी येथील पोलिस निरीक्षक संजय ठेंगे, उपनिरिक्षक समाधान फडोळ, हवालदार रविंद्र कांबळे, राहुल यादव, सुरज गायकवाड,

प्रमोद ढाकणे आदींच्या पथकाने राहुरी तालूक्यातील देवळाली प्रवरा येथील वडार वाडा येथील वैभव सुनिल गायकवाड याच्या घरात पंचांसमक्ष छापा टाकून घराची झडती घेतली. त्यावेळी पोलिस पथकाला घरातील दिवाणमध्ये एका गोणीत ५ किलो ८८५ ग्रॅम वजनाचा सुमारे ५७८ हजार २०० रुपये किंमतीचा गांजा मिळून आला. मुद्देमाल पोलिस पथकाने जप्त करून आरोपी वैभव सुनिल गायकवाड याला ताब्यात घेऊन गजाआड केले.

हवालदार गणेश भिंगारदे यांच्या फिर्यादीवरून आरोपी वैभव सुनिल गायकवाड (वय २७ वर्षे, रा. वडारवाडा, देवळाली प्रवरा, ता. राहुरी) याच्यावर गुन्हा रजि. नं. ३००/२०२४ नुसार गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे प्रदार्थ अधिनियम, १९८५ कलम २० (बी) ८ (सी) प्रमाणे अमली पदार्थाची तस्करी करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय देंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office