स्वच्छतेचा पुरस्कार प्राप्त शहरात पुन्हा कचऱ्याचे साम्राज्य

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,7 ऑक्टोबर 2020 :- स्वच्छ शहर सुंदर शहर असा जयघोष करत शहरात स्वच्छतेची मोहीम राबविण्यात आली होती. यामुळे शहराला स्वच्छतेचा पुरस्कार देखील मिळाला होता.

मात्र आता पुन्हा एकदा नगरकर स्वच्छतेचे महत्व विसरले असल्याचे चित्र सध्या शहरातील काही भागांमध्ये दिसून येत आहे. शहरातील सावेडी परिसरातील प्रेमदान चौकातील समर्थ कॉलनीत अजूनही रस्त्यावरच कचरा टाकला जात असल्याने घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.

या परिसरात घंटागाडी येत नसल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कचरा जमा झाला असल्याची तक्रार तेथील नागरिक करत आहेत. महापालिकेने स्वछ्तेचा पुरस्कार घेतला तरी देखील नगर शहरातील काही भागात कचरा उचलला जात नसल्याचे चित्र आहे. शहरात कचरा संकलनासाठी यंत्रणा उपलब्ध असतानाही या प्रभागातील स्वच्छता निरीक्षक,

घनकचरा विभागाचे कर्मचारी या भागात घंटागाडी उपलब्ध करून देत नाहीत. असे चित्र आहे. रस्त्यावरच कचरा टाकला जात असल्याने परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. महापालिकेची घंटागाडी उपलब्ध व्हावी.व वेळेत कचरा उचलला जावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24