Ahmednagar News : पाथर्डी तालुक्याच्या पश्चिम भागातील करंजी येथील गर्भगिरी डोंगराला भीषण आग लागली. बुधवारी (दि.२८) दुपारी २ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
गवत वाळलेले असल्याने काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले. अनेक लहान-मोठी झाडे आगीत भस्मसात झाली. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पाच तासांत आग आटोक्यात आणली.
प्रत्येक वर्षी उन्हाळ्यात गर्भगिरी डोंगराला आग लागते अशी तक्रार ग्रामस्थ करत होते. या आगीत मोठी वनसंपदा भस्मसात झाली होती.
करंजी गावाच्या पश्चिमेला विस्तीर्ण गर्भगिरी डोंगर पसरलेला आहे. बुधवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास करंजीजवळील घोरदरा भागात या डोंगराने पेट घेतला.
डोंगरात भरपूर वाळलेले गवत असल्याने काही वेळात आगीने रौद्ररूप धारण केले. या आगीत अनेक लहान-मोठी झाडे जळून मोठी वनसंपदा नष्ट झाली.
आगीचा प्रकार समजताच वन विभागाचे कर्मचारी आग लागलेल्या ठिकाणी आले. पाच तासांच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात वन कर्मचाऱ्यांना यश आले.
आगीचे कारण मात्र समजू शकले नाही. वृक्षलागवडीवर दरवर्षी लाखो रुपये शासन खर्च करते, तसेच संगोपनाकडेही वन विभागाने लक्ष दिले पाहिजे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. अनेकदा असे प्रकार घडत असल्याने वनसंपदा या आगीत भस्मसात होते.
ग्रामस्थ म्हणतात ..
दरवर्षी डोंगरात वन विभागामार्फत हजारो वृक्षांची लाखो रुपये खर्च करून लागवड केली जाते. वृक्षलागवडीवर लाखो रुपये खर्च करणाऱ्या वन विभागाचे संवर्धनाकडे मात्र दुर्लक्ष असते.
प्रत्येक वर्षी उन्हाळ्यात गर्भगिरी डोंगराला आग लागते. त्यामुळे डोंगरातील झाडी वाढण्याऐवजी नष्टच होत आहेत, असे या भागातील ग्रामस्थांचे म्हणणे आहे.