अहमदनगर Live24 टीम, 06 फेब्रुवारी 2021:- घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरचे दर दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे सर्व सामान्य गृहिणी त्रस्त झाल्या आहेत. कोरोना टाळेबंदीमुळे सर्वसामान्यांचे आर्थिक हाल झाले आहेत, त्यातच या दरवाढीमुळे केंद्र सरकारच्या विरोधात भयंकर असंतोष आहे.
यापूर्वीच राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने चूल पेटवा आंदोलन करून केंद्र सरकारचे लक्ष वेधले होते. पण केंद्राच्यावतीने त्याची दखल घेतली नसल्यामुळे महिला वर्गात प्रचंड नाराजी आहे. त्याचा उद्रेक शेणाच्या गोवऱ्यावर स्वयंपाक आंदोलन करून झाला.
सर्व सामान्यांना महागाईने मोठा झटका दिलाय. घरगुती गॅसच्या किमतीत मोठी वाढ झाली. तेल कंपन्यांनी गॅस सिलेंडरचा किमती जाहीर केल्या असून हे दर प्रति सिलेंडर २५ रुपयांनी वाढवण्यात आले.
शासनाचे हे गणित सर्व सामान्यांना अवाक्याबाहेरचे आहेत त्यांना ही दरवाढ जीव नकोसा करणारा आहे त्यामुळे हे पाऊल उचलावे लागत आहे.
अहमदनगर शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हा अध्यक्ष रेश्मा आठरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. त्यावेळेस युवती शहर अध्यक्षा अंजली आव्हाड,
अपर्णा पालवे, सुनंदा कांबळे, वैशाली गुंड, सुनिता पाचारणे, किरण कटारिया, सायेरा शेख, उषा सोनटक्के, लता गायकवाड, शितल राऊत, प्रिती संचेती , वैशाली भापकर, शोभा तांदळे, अर्चना केदारी, अलीशा गर्जे, शितल गाडे, विमल पाचरणे, आदी. उपस्थित होत्या.