अहमदनगर Live24 टीम, 04 फेब्रुवारी 2021:-1 फेब्रुवारीला स्थायी समितीचे आठ सदस्य निवृत्त झाले. ज्या पक्षाचे जितके निवृत्त झाले तितकेच त्या पक्षाचे नवे सदस्य स्थायी समितीत नियुक्त केले जाणार आहेत.
स्थायी समितीचे सदस्य होण्यासाठी इच्छुकांची चढाओढ लागली आहे. बुधवारी रात्रीच महापौर बाबासाहेब वाकळे यांनी प्रशासनाकडून आलेल्या प्रस्तावाचा अभ्यास करून महासभेच्या अजेंड्यावर सही केली.
10 तारखेला स्थायी समिती सदस्य निवडीसाठी महासभा बोलविण्यात आली आहे. या सभेत गटनेत्यांकडून बंद पाकिटात नियुक्त करावयाच्या सद्स्यांची नावे महापौरांकडे सादर केली जातील. महापौर महासभेत नवीन सदस्य नियुक्तीची घोषणा करतील.
त्यानंतर परिपूर्ण स्थायी समितीच्या सदस्यांचा प्रस्ताव नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयाकडे पाठविला जाईल. विभागीय आयुक्तांच्या निर्देशानुसार नवीन सभापती निवडीचा कार्यक्रम घोषित केला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.