जनरल स्टोअर्सला लागली आग ३० लाख झाले खाक

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :- श्रीगोंदे तालुक्यातील काष्टी येथील जायभाय कॉम्प्लेक्समधील तुलशी जनरल स्टोअर्सला आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीमुळे स्टोअर्समधील ३० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे अशी प्राथमिक माहिती मिळते आहे.

दरम्यान श्रीगोंदा पोलीस गस्तीवर असल्याने त्यांना ही आग लगेच लक्षात आली. त्यामुळे कॉम्प्लेक्समधील इतर दुकाने वाचली आणि कोटी रुपयांचे होणार नुकसान टळले. घटनास्थळाची आ.बबनराव पाचपुते,

पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, जिल्हा परिषद सदस्य सदाशिव पाचपुते, भगवानराव पाचपुते, अनिल पाचपुते, दिपक भोसले यांनी भेट देऊन पाहणी केली.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24