जुनाट आजार असलेल्यांना कोरोनाचा विळखा !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :- श्रीरामपूर तालुक्यात मागील वर्षी जानेवारी ते ऑगस्ट २०१९ या कालावधीत ८७६ नागरिक मृत्यूमुखी पडले होते. यावर्षी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जानेवारी ते ऑगस्टदरम्यान शासकीय आकडेवारीनुसार ८७५ नागरिकांचा कोरोनासह विविध कारणांमुळे मृत्यू झाला आहे.

ही आकडेवारी बघता कोरोनाकाळात मृत्यूदर कमी दिसत आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन शिंदे म्हणाले, कोरोनामुळे तालुक्यात सुमारे ४५ मृत्यू झाले आहेत.

ज्यांना मधुमेह, क्षयरोग, एचआयव्ही, हृदयरोग, किडनी, तसेच फुफ्फुसांचे जुनाट आजार आहेत. किंवा ज्यांची मोठी शस्त्रक्रिया झाली आहे आणि त्यामुळे प्रतिकारशक्ती कमी झालेली आहे

त्यांना कोरोनाचा विळखा लवकर बसून मृत्यूचाही धोका संभवतो. अशा रुग्णांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे कोरोनामुळे मरण पावणाऱ्यांची संख्या तुलनेने कमी असली,

तरी नागरिकांना प्रशासनाने दिलेल्या नियमांची कठोर अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. जनता कर्फ्युचे श्रीरामपुरात राजकारणच अधिक झाले.

नेते आपली पोळी भाजून घेण्यात मग्न असून जनतेच्या हिताकडे त्यांचे दुर्लक्ष झाले आहे. कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची अंमलबजावणी योग्य पद्धतीने व्हावी, याचा आग्रह धरण्याएवजी पत्रकबाजी करण्यातच काहीजणांना रस आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24