‘गैरसमज दूर करा, भीती पळवा, उपचार घेऊन कोरोनामुक्त व्हा’ मंत्री तनपुरे म्हणतात…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,5 ऑक्टोबर 2020 :- कोरोनाने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. आर्थिक घडी पुरती विस्कटलेली आहे. देशभराचा विचार करता महाराष्ट्रात कोरोनाचे संक्रमण जास्त आहे. मुंबई, पुणे यांसारख्या मेट्रोसिटीमध्ये हे प्रमाण लक्षणीय राहिले.

अहमदनगर जिल्ह्यातही याचे प्रमाण लक्षणीय राहिले आहे. जनतेमध्ये कोरोना आजाराबाबत भीती व गैरसमज असल्याने नागरिक तपासणीसाठी लवकर पुढे येत नाहीत, उपचारास विलंब होतो. त्यामुळे या आजारातून विविध नको त्या गोष्टी घडतात. ‘गैरसमज दूर करा,

भीती पळवा, उपचार घेऊन कोरोनामुक्त व्हा’ असे आवाहान मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासकीय उपाययोजना व माहिती देण्यासाठी राहुरी तहसील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी तनपुरे म्हणाले, आपल्याकडे तपासणीची सुविधा चांगल्याप्रकारे उपलब्ध असून कीटची संख्या उपलब्ध आहे.

तरी लवकर तपासणी झाल्यास उपचारांबरोबरच रोगाचा फैलाव काही प्रमाणात कमी होईल, यासाठी सर्वांची साथ आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. राहुरी शहर, वांबोरी, देवळाली प्रवरा याठिकाणी मास्क न वापरणार्‍यांवर उद्यापासून कठोर कारवाई केली जाईल. यासाठी नगरपरिषदेचे पथक व पोलिसांचे पथक नेमण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

तालुक्यात आजपर्यंत 1 हजार 822 रुग्ण सापडले असून 1 हजार 591 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 181 रुग्ण उपचारात घेत आहेत. जिल्ह्यात कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. ग्रामीण भागातील अनेक तालुके आता कोरोना आपल्या विळख्यात घेत आहे.

राहुरी तालुक्यातील अनेक गावात कोरोनाचे रुग्ण आहेत. याच पार्श्वभूमीवर सर्वानी काळजी घेण्याचे आणि प्रशासकीय नियम पाळण्याचे आवाहान करण्यात येत आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24