अहमदनगर बातम्या

लाळ्या खुरकत लसीकरण करु घ्यावे व आपल्या जनावरांच्या आरोग्याची काळजी घ्यावी

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑक्टोबर 2021 :- शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून गायी म्हशींच्या दूधाच्या उत्पादनावर व काही कुटूंब फक्त दूध धंद्यावर उदारनिर्वाह करतात.

यासाठी साखर कारखान्याकडे बाहेर गाववरुन येणार्‍या उस तोड कामगारांच्या जनावरांपासून या रोगाचा प्रादूर्भाव वाढू नये यासाठी लाळ्या खुरकत लसीकरण करु घ्यावे व आपल्या जनावरांच्या आरोग्याची काळजी घ्यावी.

जाणून घ्या रोगाची लक्षणे :- नवीन लंपी स्कीन डिसीज रोगाची लक्षणे जनावरांच्या त्वचेवर गाठी, डोळे, मान, पाय, मायांग, कासेच्या भागात कमी अधिक प्रमाणात 10-50 मिमी व्यासाच्या गाठी येतात. काही जनावरांत पायावर सुज येणे, जनावरे लंगडतात.

उपाययोजना… :- लंपी स्किन डिसीज रोगाचे नियंत्रणासाठी आजारी जनावरांच्या संपर्कातील जनावरांना आयव्हरमेक्टीन इंजेक्शन दिल्यास किटक नियंत्रण होवुन रोग प्रसारण काही प्रमाणात आळा घालु शकतो. या आजारावर नियंत्रणांसाठी जनावरांच्या संपर्कात आलेले साहित्याचे निर्जंतुकीकरण, वाहनांचे निर्जंतुकीकरण व परिसर निर्जेंतुकीकरण करण्यासाठी सोडीयम हायपोक्लोराईट, द्रावण वापरुन निर्जेंतीकरण करावे.

कशामुळे होतो आजार… :- लंपी आजाराचा प्रसार मुख्यत्वेकरुन किटकामुळे द्रावणाच्या माश्या डास, गोचिड, चिल्टे, निरोगी बाधित जनावरे यांच्यातील प्रत्यक्ष स्पर्शाने चारा, पाणी दूशीत मुळे प्रसार होवू शकतो.

रोग नियंत्रणासाठी या गोष्टी करा… :- लंपी स्किन डिसीज रोगाचे नियंत्रण करण्यासाठी बाधीत जनावरांना वेगळे करावे, बाधीत व निरोगी जनावरे एकत्रित चारावयास सोडू नये, लंपी आजाराचे निदानासाठी जनावरांची संख्या विषाणु वाहक माश्यांचे प्रमाण जनावरांचे अमर्याद स्थलांतरण, हालचाल यावरुन, ताप, शरीरावर गाठी, सुज यावरुन निदान करता व रोखता येते.

Ahmednagarlive24 Office