लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्या- माजी मंत्री आ.विखे पाटील यांची मुख्‍यमंत्र्यांकडेे पत्राव्‍दारे मागणी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,30 जुलै 2020 :- महाराष्‍ट्राचे भूमिपुत्र आणि साहित्‍यरत्‍न लोकशाहीर आण्‍णाभाऊ साठे यांना केंद्र सरकारने भारतरत्‍न पुरस्‍कार देवून गौरव करावा यासाठी राज्‍य सरकारने शिफारस करावी,अशी मागणी माजीमंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी मुख्‍यमंत्र्यांकडे केली आहे.

या संदर्भात मुख्‍यमंत्री उध्‍दव ठाकरे यांना दिलेल्‍या पत्रात आ.विखे पाटील यांनी म्‍हटले आहे की, लोकशा‍हीर आण्‍णाभाऊ साठे यांना भारतरत्‍न पुरस्‍काराने सन्‍मानित करावे या मागणीसाठी राज्‍यात सुरु झालेल्‍या चळवळीला माझा पाठींबा असुन,

आण्‍णाभाऊ साठे यांनी साहित्‍य आणि सामाजिक क्षेत्रात दिलेल्‍या योगदानाचा विचार करुन राज्‍य सरकारनेही या पुरस्‍कारासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करण्‍याबाबत त्‍यांनी सुचित केले.

साहित्‍यरत्‍न आण्‍णाभाऊ साठे यांनी मराठी साहित्‍यामध्‍ये अमुल्‍य असे योगदान दिले. ३५ कांदब-या, १५ नाट्य संग्रह, पटकथा, लावणी, पोवाडे इत्‍यांदीच्‍या विपुल अशा लेखानातून मराठी साहित्‍याला सातासमुद्रापार पोहचविले आहे.

त्‍यांच्‍या साहित्‍यकृतींची अन्‍य भाषांमध्‍येही भाषांतरे झाली. मार्स्‍क, डॉ.आंबेडकर अशा विचारवंतांच्‍या प्रभावाने आण्‍णाभाऊ साठे यांनी सोशित, वंचित समाजाचे दु:ख आपल्‍या साहित्‍यातुन आधोरेखीत केले.

त्‍यांचे कार्य केवळ एका समाजापुरते सिमीत नसुन सर्वच समाज घटकांना मार्गदर्शक ठरणारे आहे. आण्‍णाभाऊ साठेंच्‍या योगदानाचा यथोचित गौरव भारतरत्‍न पुरस्‍काराने झाल्‍यास तो महाराष्‍ट्राचाही सन्‍मान ठरणार असल्‍याने याबाबत आपण केंद्र सरकारकडे शिफारस करावी अशी मागणी आ.विखे पाटील यांनी केली आहे.

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24