अहमदनगर बातम्या

कर्जत-जामखेडची जागा काँग्रेसला द्या, नाहीतर…… काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी दिला इशारा! मविआच्या घटक पक्षाकडूनच रोहित पवारांना वाढला विरोध

Published by
Ajay Patil

Ahilyanagar News:- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्हींमध्ये काही जागांच्या बाबतीत तिढा कायम असून या जागां बाबत अद्याप जागा वाटप निश्चित करण्यात आलेले नाही. अशातच जर आपण कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाच्या दृष्टिकोनातून बघितले तर या ठिकाणी भाजपच्या माध्यमातून माजी आमदार राम शिंदे यांना संधी देण्यात आली आहे.

तर महाविकास आघाडीच्या माध्यमातून या विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून रोहित पवारांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. परंतु या मतदारसंघातून महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या काँग्रेस कडूनच रोहित पवारांना विरोध वाढल्याचे दिसून येत आहे.

कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे जागा काँग्रेसला मिळावी, अन्यथा सांगलीमध्ये जे झाले त्याची पुनरावृत्ती करू असा इशाराच कर्जत मधील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिला.

त्यामुळे रोहित पवार यांना त्यांच्या मतदारसंघातूनच वाढत असल्याचे या निमित्ताने दिसून आले. कर्जत शहरात रविवारी कर्जत-जामखेड काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक झाली व बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत हा इशारा कांग्रेस पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून देण्यात आला.

कर्जत-जामखेडची जागा काँग्रेसला द्या, नाहीतर…… काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी दिला इशारा!

कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाची जागा काँग्रेसला मिळावी, अन्यथा सांगलीची पुनरावृत्ती करू, असा इशारा कर्जतमधील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिला. महाविकास आघाडीला आधीच मधुकर राळेभात, प्रवीण घुले यांनी सोडचिठ्ठी दिली आहे. उद्धवसेनेनेही बैठक घेऊन उमेदवारीची मागणी केली होती.

आता काँग्रेसच्या भूमिकेमुळे आमदार रोहित पवार यांना मतदारसंघातून विरोध वाढत असल्याचे दिसते आहे. कर्जत शहरात रविवारी दुपारी कर्जत-जामखेड काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बैठक झाली.

या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी वरील भूमिका जाहीर केली. बैठकीत सुरुवातीपासून कर्जत- जामखेड तालुक्यातील सर्वच प्रमुख कार्यकर्त्यांनी आपल्याच नेत्यांना धारेवर धरले. निवडणूक आल्यावरच सर्वांना पक्षाची आठवण येते. निवडणूक झाली की सर्व आपापल्या भूमिकांना विसरतात.

यावर काही तरी ठोस निर्णय घ्या, अशी कणखर भूमिका मांडली. मागील विधानसभा निवडणुकीतही दक्षिण नगरमध्ये पक्षाचे चिन्ह गायब झाले होते. कर्जत-जामखेडची हक्काची जागा मित्रपक्ष असणाऱ्यांना दिली. आता ही जागा काँग्रेसलाच घ्या, असा सूर कार्यकर्त्यांनी लावला.

काँग्रेस पक्षाला जागा मिळत नसल्याने लोक पक्षाच्या विचारधारेपासून दुरावत चालले आहेत. काँग्रेसला जागा घेतल्यास ही जागा निवडून आणण्याची जबाबदारी प्रत्येक कार्यकर्ता घेईल, असा विश्वासही काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी बैठकीत व्यक्त केला.जामखेड तालुकाध्यक्ष शहाजीराजे भोसले,

कर्जतचे किरण पाटील, युवकचे सचिन घुले आणि राहुल उगले यांनी कार्यकर्त्यांच्या भावना वरिष्ठ नेतृत्वाच्या कानावर टाकण्याची ग्वाही दिली. यावेळी ज्येष्ठ नेते अॅड. कैलास शेवाळे, बापूसाहेब काळदाते, मुबारक मोगल, बाप्पाजी धांडे, श्रीहर्ष शेवाळे, भाऊसाहेब तोरडमल, तात्यासाहेब ढेरे, अॅड. माणिकराव मोरे, प्रदीप पाटील, मिलिंद बागल, किशोर तापकीर आदी उपस्थित होते.

Ajay Patil