अहमदनगर Live24 टीम, 5 नोव्हेंबर 2020 :- नेवासे तालुक्यातील रस्तापूर येथे बुधवारी पहाटे गणेश धाडगे या शेतकऱ्याची शेळी बिबट्याने फस्त केली. दोनच दिवसांपूर्वी बाजारातून १४ हजार रूपयांना ही शेळी विकत घेतली होती.
घराजवळ असलेल्या लोखंडी जाळीत तिला ठेवले होते. जमीन उकरुन बिबट्याने शेळीचा फन्ना उडवला. लोकांनी आरडाअोरड केल्यानंतर बिबट्या उसात पसार झाला.
नेवासे तालुक्यातील कौठा, रस्तापूर, पिंपळगाव, चांदा परिसरात सध्या बिबट्याचा वावर आहे. सध्या ऊसतोडणी सुरू असल्याने काही ठिकाणी शेतं मोकळी होत आहेत. रस्तापूर परिसरात अनेकांनी बिबट्याला पाहिले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved