अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2020 :- आपल्याकडे ‘देव तारी त्याला कोण मारी’ अशी म्हण आहे. याचीच प्रचिती नुकतीच पुणतांबा याठिकाणी आली. येथील भाजी विक्रेत्या दोन महिला आलेल्या संकटातून बालंबाल बचावल्या.
वेळ आली होती पण काळ आलेला नव्हता अशीच काहीशी प्रतिक्रिया यावेळी बघ्यांनी दिली. सविस्तर माहिती अशी, येथे जुन्या प्राथमिक आरोग्य केंद्रात महात्मा फुले भाजीमंडई सुरु केलेली आहे
भाजीमंडईमुळे विक्रेते व ग्राहक यांची सोय झालेली आहे. काल 12 वाजेच्या दरम्यान वारे सुटल्यामुळे भाजीमंडईच्या पश्चिमेला एका हॉटेलजवळ असलेल्या सुबाभळीच्या झाडाची फांदी अचानक तुटली.
मात्र फांदी तुटतांना तिचा मोठ्याने आवाज आला. झाडाच्या फांदीच्या खाली ज्यांनी दुकान टाकले होते त्यांनीही जीवाच्या आकांताने पळ काढला.
मात्र तुटलेली फांदी त्यांच्या दुकानावर न पडता विजेच्या पोलमध्ये अडकली. त्यामुळे अनेकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. तुटलेली झाडाची फांडी पोलला अडकल्याने त्याखाली बसलेल्या भाजी विक्रेत्यांना काही नुकसान झाले नाही.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved