Ahmednagar News : दिवाळी सुट्टीचा रविवार (दि.१९) शेवटचा दिवस होता. क्रिकेट वर्ल्ड कपचा अंतिम सामना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया असल्याने अनेक प्रवाशांनी गर्दी कमी असेल असा विचार करून तारकपूर बस स्थानक गाठले.
सर्वजण याच विचाराने पुण्याला जाण्यासाठी येथे आले आणि एकच गर्दी जमली. सर्वच्या सर्व बसेस त्यात लालपरीनेही भाव खाल्ला आणि शिवशाही आणि शिवनेरी तसेच निमआरामही हाउसफुल झाल्या, अनेक प्रवाशांनी उभे राहून प्रवास केला तर अनेक प्रवाशी पुन्हा घरी परतले.
यात खासगी वाहतुकीनेही संधीचे सोने करणे अजिबात सोडले नाही. नगरहून पुण्याचे सर्वात कमी भाडे ४०० रुपये प्रति प्रवाशी आकारत तुम्हाला यायचे तर या अशी भाषा ऐकावी लागली.
एकीकडे महामंडळाच्या बसेस फुल आणि दुसरीकडे खासगी वाहनांची लुटालूट असा प्रकार रविवारी पहायला मिळाला, ज्यांना रविवारी अत्यावश्यक आणि पुण्याला जाणे अनिवार्य होते असे नगरकर दुसरा काही मागं नाही त्यामुळे असे आर्थिक भुरंदंड देणारे भाडे देऊन पुण्याला गेले.
ज्यांना एवढे भाडे देणे शक्य नव्हते ते आपल्या घरी परतले. प्रवाशांची अधिक संख्या आणि गर्दी पाहून एसटी महामंडळानेही बसेस वाढविणे गरजेचे असून यामुळे जनसामान्य प्रवाशाचे हाल थांबतील आणि लूटही थांबेल. एसटी महामंडळाचे उत्पन्न या सुट्टीच्या सीझनमध्येच वाढते त्यामुळे त्यांनी अधिकच्या जादा बसेस या कार्यकाळात वाढविणे अत्यावश्यक आहे.