अहमदनगर Live24 टीम,20 ऑक्टोबर 2020 :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चांगले दिवस आले आहे. देशाचे नेते खासदार शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाची बांधणी करताना सर्वच घटकाना समावेश करून घेतला असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
श्रीरामपूर येथे बॅरिस्टर रामराव आदिक सभागृह येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवर्निवाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार आमदार जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
यावेळी नगराध्यक्षा अनुराधा आदिक, कपील पवार, गजेद्र भांडवलकर, शहराध्यक्ष लकी सेठी, तालुकाध्यक्ष कैलास बोर्डे, महिलाध्यक्ष अर्चना पानसरे, भटक्या विमुक्त जिल्हाध्यक्ष मल्लू शिंदे, नगरसेवक रईस जहागिरदार,
राजेंद्र पवार, अल्तमेश पटेल, गुरुचरण भटियाणी, योगेश जाधव, सोहेल शेख, निरंजन भोसले, अॅड. राजेश बोर्डे, गणेश ठाणगे, गोपाल वांयदिशकर, रोणीत घोरपडे, उत्तमराव पवार आदी उपस्थित होते.
राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक यांनी नुकतेच पक्षामध्ये फेरबद्दल केले. सोहेल शेख (दारुवाला) यांची अल्पसंख्याक प्रदेश सचिवपदी,
वडाळा येथील सचिन पवार यांची युवक तालुकाध्यक्षपदी, तर हर्षल दांगट यांची विद्यार्थी तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved