अहमदनगर : सुरभि हॉस्पिटल तर्फे कॅन्सर उपचार आणि तपासणी शिबीर डॉ तुषार मुळे मेडिकल आंकोलॉगिस्ट यांच्या मार्गदर्शनाखाली 23 फेब्रवारी रोजी 10 ते सायंकाळी 5 या वेळात सुरभि हॉस्पिटल, गुलमोहोर रोड अहमदनगर येथे आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिरामध्ये सर्व कॅन्सर संबंधी उपचार आणि मार्गदर्शन मिळणार आहे. या मुले जास्तीत जास्त लोकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आव्हान सुरभि हॉस्पिटल कडून करण्यात आले आहे. कॅन्सर चे काही लक्षणे आहेत, नव्याने गळ्या भोवती गाठी आहेत, तोंडा मध्ये अल्सर आहेत, बरे होत नाही, पूर्वी कॅन्सर ऑपेरेशन झालेलं आहे परत गाठी आल्या उपचार अर्धवट झालाय पुर्ण झाला नाही, नव्याने कॅन्सर झालाय, उपचार आणि मार्गदर्शन पाहिजे असल्यास शिबिर मध्ये कोणी दाखवावे.
तसेच स्तनाच्या गाठी गर्भ पिशवीचे आजार. कॅन्सर ची हिस्टरी आहे घरामध्ये, स्तनांचा कॅन्सर ओवरी चा कॅन्सर कोलोन कॅन्सर (आतड्याचा) अशी हिस्टरी असेल तर त्यांनी सुद्धा तपासून घ्यावे असे आव्हान सुरभि हॉस्पिटल च्या वतीने करण्यात आले आहे.
डॉ रोहित फुलवर ओन्को प्लास्टिक सर्जन, डॉ वैभव अजमेर लिव्हर तज्ज्ञ, डॉ श्रितेज जेजुरकर लाप्रोस्कॉपीक सर्जन, सुलभा पवार स्रीरोग तज्ज्ञ, डॉ विलास व्यवहारे अस्थिरोग तज्ज्ञ, डॉ प्रियान जूनागडे फिजिसियान तसेच सुरभि हॉस्पिटल ची पुर्ण टीम कॅन्सर तपासणी करणार आहे.