नगरकरांसाठी खुशखबर! भाविकांसाठी ग्रामदैवताचे दारे खुलणार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 16 नोव्हेंबर 2020 :-कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बंद असलेली राज्यातील मंदिरे उघडण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर नगरकरांसाठी देखील एक खुशखबर समोर आली आहे.

नगर शहरचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर कोविड-१९ मुळे भाविकांसाठी बंद करण्यात आले होते .परंतु आता येत्या सोमवार पासून म्हणजे पाडव्याच्या शुभमुहूर्तावर शासनाने मंदिर उघडण्याचा जो निर्णय घेतला आहे.

त्यामुळे शहर चे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर च्या ट्रस्ट पदाधिकारी यांची रविवारी साय पाच वाजता अध्यक्ष ॲड.अभय आगरकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

यामध्ये शासनाने घालून दिलेले नियामचे पालन करून काही नियमावली तयार करण्यात आली ती खालील प्रमाणे

1) कोणत्याही भाविकाला मास्क शिवाय मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही

2) मंदिरच्या वतीने सॅनिटायझर उपलब्ध करून देण्यात करून देण्यात येईल.सॅनिटायझ झाल्याशिवाय कोणालाही प्रवेश नाही

3) मंदिर उघडण्याची वेळ सकाळी ९ ते दुपारी १ आणि संध्यकाळी ४ ते ७ यावेळेमध्ये भाविकांसाठी खुले राहील

4) आरतीच्या वेळेमध्ये कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही

5) एका वेळेस फक्त १५ भाविकांना मंदिरमध्ये प्रवेश दिला जाईल.

6) जेष्ठ नागरिक व १० वर्षाच्या आतील मुलांनी दर्शनासाठी येण्याचे टाळावे वरील सर्व नियमाचे काटेकोर पणे पालन करण्यात येणार असल्याचे अभय आगरकर यांनी सांगिलते

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24