अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2020 :-शिर्डी येथील साईबाबा मंदिरात २५ , २६ व २७ डिसेंबरला दर्शनार्थी भक्तांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे.
त्यातच नववर्षाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच ३१ डिसेंबरला साई मंदिर रात्रभर खुले ठेवण्याचा निर्णय संस्थानने घेतला आहे. दरम्यान कोरोना विषाणूचा संसर्ग अद्यापही संपलेला नसून याच पार्श्वभूमीवर आता राज्यातील मंदिरे सरकारने घालून दिलेल्या नियमावलीनुसार सुरु करण्यात आली आहेत.
त्यानुसार राज्य सरकारच्या नियमांचे पालन करत 31 डिसेंबरच्या रात्रीही मंदिर सुरु ठेवण्याचा निर्णय साई संस्थानकडून घेण्यात आला आहे. त्या संदर्भात त्यांनी एक पत्रक साई संस्थांनी घेतला आहे.
संस्थानच्या या निर्णयामुळे नववर्षाच्या सुरुवातीला जास्तीत जास्त भाविकांना साईंच दर्शन घेता येणार आहे. अनलॉकनंतर राज्यातील मंदिरे सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला.
तेव्हापासून आतापर्यंत जवळपास साडे तीन लाख भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला आहे. आता नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात मोठा पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.