अहमदनगर Live24 टीम, 8 जानेवारी 2021 :- जिल्ह्यातील १३ केंद्रांवर शासनाद्वारे हमीभावाने तूर खरेदी केली जाणार आहे.तसेच, या केंद्रांवर तूर ६ हजार रुपये प्रति क्विंटल या हमीभावाने खरेदी केली जाणार आहे.
केंद्र शासन आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत तूर खरेदीसाठी नोंदणी करण्यासंदर्भातील आवाहनकरण्यात आले आहे.
जिल्ह्यात २८ डिसेंबरपासूनच तूर खरेदीसंदर्भात शेतकरी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली असून त्यासाठी जिल्ह्यात १३ खरेदी केंद्रे प्रस्तावित आहेत. यापैकी ११ खरेदी केंद्रांवर शेतकरी नोंदणी सुरू करण्यात आली आहे. मात्र, शेतमाल नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी तलाठी पीक पेराचा उल्लेख असलेला 8अ, सात-बारा उतारा,
आधारकार्डाची छायांकित प्रत, बँक पासबुकची छायाप्रत सादर करणे आवश्यक आहे. बँक पासबुकची छायांकित प्रत सादर करताना रद्द केलेला धनादेश अथवा बँक खात्याबाबत पूर्ण माहिती असलेले बँक स्टेटमेंट सादर करावे. हे बँक खाते बंद अथवा जनधन योजनेतील नसावे याची दक्षता संबंधितांनी घ्यावी.
ज्या तालुक्यातील क्षेत्र आहे, त्याच तालुक्यातील खरेदी केंद्रावर शेतकर्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या केंद्रांवर तूर ६ हजार रुपये प्रति क्विंटल या हमीभावाने खरेदी केली जाणार आहे.
ही आहेत जिल्ह्यातील 13 तूर खरेदी केंद्र :-