अहमदनगर बातम्या

Ahmednagar News : शेतकऱ्यांनो खुशखबर ! ‘या’ तारखेला तुमच्या खात्यावर शिंदे सरकार टाकेल २ हजार रुपये

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : राज्यातील सुमारे ९० लाख शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या दुसऱ्या हप्त्यापोटी सरकारने १ हजार ७९२ कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला असून

लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हा निधी वितरित करण्यासाठी प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे.

या संदर्भातील शासन निर्णय काल निर्गमित करण्यात आला आहे. या योजनेच्या दुसऱ्या हप्त्याद्वारे राज्यातील सुमारे ९० लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर थेट प्रत्येकी दोन हजार रुपये याप्रमाणे रक्कम जमा करण्यात येईल.

शेतकऱ्यांना फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत ही रक्कम मिळणार आहे. केंद्र सरकारकडून सध्या पी एम किसान योजना सुरु असून या योजनेचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत महायुती सरकारने नमो शेतकरी महासन्मान योजना महाराष्ट्रामध्ये सुरु केली आहे.

या अंतर्गत प्रत्येक वर्षात पीएम किसानच्या सोबतीला नमो शेतकरी महासन्मान योजनेतून जे शेतकरी पात्र आहेत त्यांना ६ हजार मिळणार आहेत.

एप्रिल ते जुलै २०२३ या पहिल्या हप्त्यामध्ये १ हजार ७२० कोटी रुपये निधीचे शिर्डीत पंतप्रधान मोदींच्या हस्ते राज्यातील सुमारे ८६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट वितरण करण्यात आले असून आता ऑगस्ट ते नोव्हेंबर २०२३ या दुसऱ्या हप्त्यासाठी आता १ हजार ७९२ कोटी रुपये निधी वितरित करण्यात येणार आहे

या महायुती सरकारच्या योजनेचा लाभ राज्यातील जवळपास ९० लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे. फेब्रुवारी महिना अखेर पर्यंत या निधीचे वितरण करण्यात येणार असून महाराष्ट्रात लाभार्थी शेतकऱ्यांच्या संख्येत सुमारे १३ लाख शेतकऱ्यांची वाढ झाली आहे. यासाठी १ हजार ७९२ कोटी रुपये निधी लागणार आहे.

शासन शेतकऱ्यांसाठी, त्याच्या आर्थिक उन्नतीसाठी विविध योजना राबवत असते. त्याचाच एक भाग म्हणून नमो शेतकरी महासन्मान योजना शासनाने सुरु केलेली आहे.

Ahmednagarlive24 Office