शेतकऱ्यांसाठी खुशखबर! दिवाळीपूर्वी खात्यावर जमा होणार पैसे

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :- आधीच कोरोनामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांना यंदाच्या वर्षी नैसर्गिक संकटांमुळे मोठे आर्थिक नुकसानाना सामोरे जावे लागले आहे. यातच शेतकऱ्यांसाठी एक खुशखबर येत आहे.

ते म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग होणार आहे. ऊसउत्पादकांच्या विश्वासामुळे युटेक शुगरचा चौथा गळीत हंगाम सुरू झाला आहे. मागील हंगामात जाहीर केलेल्या 2511 रुपये दरातील उर्वरित 260 रुपये दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यांवर वर्ग करणार आहे, अशी घोषणा युटेक शुगरचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र बिरोले यांनी केले.

तालुक्‍यातील कौठे मलकापूर येथील युटेक शुगर कारखान्याच्या चौथ्या गळीत हंगामाचा प्रारंभ गव्हाणीत उसाची मोळी टाकून झाला. त्या वेळी बिरोले बोलत होते. बिरोले पुढे बोलताना म्हणाले कि, यंदा कारखाना पूर्ण क्षमतेने चालवून, जास्तीत जास्त गाळपाचे उद्दिष्ट आहे.

मागील हंगामात झालेले आर्थिक नुकसान व कोरोना संकटात अनेकांनी दिलेल्या नाहक त्रासामुळे मनस्ताप झाला. मात्र, आपण दराचा शब्द पाळणार आहोत असे ते म्हणाले.

दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांचे मागील वर्षाचे उर्वरित 260 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यांवर वर्ग केले जाणार आहेत. शेतकऱ्यांनी ऊसतोडीसाठी कारखाना प्रशासनाशी संपर्क साधावा असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24