अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2020 :-ऑनलाईन पैश्याचे व्यवहार करणाऱ्यासाठी एक आनंदाची बातमी आहे भारतीय रिझर्व्ह बँकेनं नुकताच एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून मोठ्या रकमेचे ऑनलाईन व्यवहार करण्यासाठी वापरण्यात येणारी आरटीजीएस ही सुविधा यापुढे २४ तास उपलब्ध असेल सध्या आरटीजीएसची सुविधा मर्यादित वेळेसाठी उपलब्ध केली जाते.
सकाळी ७ ते संध्याकाळी ६ या वेळेतच आरटीजीएस सुविधेचा वापर ग्राहकांना करता येतो. महिन्यातील दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी ही सेवा बंद ठेवली जाते. मात्र यापुढे आठवड्यातील सर्व दिवस आणि २४ तास ही सुविधा उपलब्ध असणार आहे.
आरटीजीएस ही सुविधा मोठ्या रकमांचे ऑनलाईन व्यवहार करण्यासाठी वापरण्यात येते. या सुविधेद्वारे एका वेळी किमान २ लाख ते कमाल १० लाख रुपये एका खात्यातून दुसऱ्या बँक खात्यात ट्रान्सफर करता येऊ शकतात. हे व्यवहार प्रत्यक्ष बँकेत जाऊन करणंदेखील शक्य असतं.
मात्र त्यासाठी बँकेत जाऊन फॉर्म भरणे, काऊंटरवर त्याची तपासणी होणे आणि काऊंटरवरून पैसे संबंधित खात्यावर जमा होणे, या प्रक्रियेत ग्राहकांचा अधिक वेळ खर्च होतो. त्याऐवजी आरटीजीएस प्रणालीचा वापर करून काही सेकंदात पैशांचे व्यवहार पूर्ण होतात.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved