अहमदनगर बातम्या

खुश खबर.….. आता पोस्ट विभागाची घरपोहोच बाल आधार कार्ड योजना!

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2022 :-  पोस्ट खात्याने काही निवडक टपाल कार्यालयामार्फत व पोस्टमनमार्फत ० ते ५ वर्ष वयोगटातील लहान मुलांचे नवीन आधार कार्ड म्हणजे बाल आधार कार्ड काढण्यासोबतच आधार कार्डला मोबाईल नंबर संलग्न करण्याबाबतची विशेष मोहीम हाती घेतली आहे.

त्यामुळे आता ५ वर्षांपर्यंतच्या वयोगटातील लहान मुलांना नवीन आधार कार्ड काढण्यासाठी आधार कार्ड केंद्र किंवा ई सेवा केंद्र येथे जाण्याची आवश्यकता नसून त्यांचे आधार कार्ड आता पोस्टमनमार्फत मोफत काढून दिले जाणार आहे.

सध्या नागरिकांना कोणत्याही कामासाठी आधार कार्ड क्रमांकाची आवश्यकता असते. नवीन आधार कार्ड काढण्याचे काम सध्या मोजक्याच आधार केंद्रामार्फतच चालू आहे.

त्यामुळे नागरिकांना नवीन आधार कार्ड काढणे किंवा आधार कार्डमध्ये दुरुस्ती करणे, यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

ही परिस्थिती विचारात घेत डाक विभागामार्फत आधार मोबाईल संलग्नीकरणाची उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच पाच वर्षांपर्यंतच्या लहान मुलांचे

आधार कार्ड पोस्टामार्फत घरपोहोच काढून देण्याची विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्यासाठी पोस्टमन आपल्या मोबाईल मधून लहान मुलांचा फोटो घेऊन तो अपलोड करणार आहे.

Ahmednagarlive24 Office