खुशखबर ! कुकडी आवर्तन 1 फेब्रुवारीपासून सोडण्यात येणार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2020 :-कुकडी आवर्तन 1 फेब्रुवारी 2021 पासून सोडण्यात येणार आहे. याबाबतची माहिती आमदार बबनराव पाचपुते यांनी दिली आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून कुकडी व घोड आवर्तन सोडण्याची मागणी होत आहे.

त्यामुळे पुणे येथे कालवा सल्लागार समितीची बैठक झाली या बैठकीत आमदार बबनरावजी पाचपुते यांना कोरोना ग्रस्त असल्यामुळे प्रत्यक्ष हजर राहता आले नाही.

परंतु आपल्या प्रतिनिधी मार्फत कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये दिनांक 1 जानेवारी 2021 पासून कुकडी व घोड धरणाचे आवर्तन सोडण्याची मागणी लेखी पत्राद्वारे केली होती.

या बैठकीमध्ये अधिकाऱ्यांनी धरणातील उपलब्ध पाणीसाठ्याची माहिती दिली व दिनांक 1 फेब्रुवारी 2021 रोजी पासून कुकडीचे आवर्तन सोडण्याचा निर्णय झाला.

तसेच दि.10 फेब्रुवारी 2021 पासून घोड धरणातून रब्बीचे एक आवर्तन सुटणार आहे असे त्यांनी सांगितले. तरी शेतकऱ्यांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा असे आवाहन आमदार बबनराव पाचपुते यांनी केले.

अहमदनगर लाईव्ह 24