अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :-अहमदनगरचे मिनी मंत्रालय अर्थात जिल्हा परिषदमधील कर्मचाऱ्यांना खुशखबर आहे. 198 कर्मचार्यांना वेतन वाढ देण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे. राज्य शासनाने 2006 पासून सहावा वेतन आयोग लागू केला.
परंतु त्याचा प्रत्यक्ष लाभ एप्रिल 2009 पासून मिळाला. दरम्यान हा वेतन आयोग लागू करताना अतिउत्कृष्ट काम करणार्या कर्मचार्यांना एक किंवा दोन आगाऊ वेतनवाढी देण्याच्या तरतुदीवर राज्य सरकारने निर्णय घेतला नाही.
त्यामुळे जानेवारी 2006 ते मार्च 2009 या कालावधीतील ज्या कर्मचार्यांना आगाऊ वेतनवाढी मंजूर झाल्या त्यांना सहाव्या वेतन आयोगात त्याचा लाभ मिळाला नाही.
त्यामुळे काही कर्मचार्यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करून दाद मागितली. जुलै 2019 मध्ये याबाबत कर्मचार्यांचे बाजूने निर्णय झाला व आगावू वेतनवाढ कर्मचार्यांना देण्याबाबत न्यायालयाने जिल्हा परिषदेला आदेश दिले. त्यानुसार आता या कर्मचार्यांना ही रक्कम मिळणार आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved