अहमदनगर बातम्या

खुशखबर ! नगर- मनमाड रस्त्याचे काम येत्या 15 दिवसात सुरु होणार

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑक्टोबर 2021 :- नगर- मनमाड राष्ट्रीय महामार्गाची मोठी दुरावस्था झाली आहे. यामुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. तसेच शिर्डीकडे जाणाऱ्या अनेक भाविकांचा ओघ देखील या रस्त्याने असल्याने ,पंथी वर्दळ या महामार्गावर असते.

मात्र दुरावस्थेच्या विळख्यात अडकलेला या राष्ट्रीय महामार्गाचे दुरुस्तीचे काम येत्या 15 दिवसांत सुरु होणार आहे. तसेच सुमारे वर्षभरात महामार्ग दर्जेदारपणे पूर्ण होईल, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक आणि परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी शिर्डीत व्यक्त केला आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी नुकतीच शिर्डी येथील साईदरबारी हजेरी लावत साईंचे दर्शन घेतले. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

विशेष म्हणजे खा. सुजय विखे पाटील यांनी स्वतः गाडी चालवत ना. गडकरी यांना राहुरी ते शिर्डी या दरम्यान नगर-मनमाड रस्त्याची झालेली दयनीय अवस्था निदर्शनास आणून दिली. दरम्यान रस्त्याची झालेली दुरावस्था पाहता मंत्री गडकरी यांनी या रस्त्याच्या कामाची घोषणा केली.

त्यामुळे या रस्त्याच्या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान येत्या वर्षभरात वाहनचालकांना या महामार्गावरून वाहन चालविताना अड्चण येणार नाही असा शब्द गडकरी यांनी दिला आहे.

अनेक वर्षांपासून नगर – मनमाड महामार्गाची मोठी दुरावस्था झाली आहे. 490 कोटी रुपयांचे कंत्राट देऊनही रस्त्याचे काम अद्यापही सुरू होत नसल्याबाबत मंत्री गडकरींना विचारले असता नगर – मनमाड महामार्गाचे कामाचा आढावा घेतला असून येत्या 15 दिवसात रस्ता बांधकामाला सुरुवात होऊन वर्षभरात काम दर्जेदार रित्या पूर्ण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला

Ahmednagarlive24 Office