गुगल मॅपने रस्ता शोधता शोधता कर गेली धरणात

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 10 जानेवारी 2021 :-अनेकदा प्रवासाला निघाले कि आपल्याला निश्चित स्थळाची माहिती नसल्यास आपण गुगल मॅपची मदत घेतो.

मात्र असेच काही जण गुगल मॅपच्या साहाय्याने संबंधित ठिकाणी पोहचण्यासाठी निघाले असता कार थेट धरणात गेल्याची विचित्र घटना घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, शनिवारी रात्री पुणे येथील सत्याराज शेखर व मित्र समीर सुधीर राजूरकर, चालक सतीश घुले (वय ३५) हे आपल्या इंडीव्हो फोर्ड कारने कळसुबाईकडे निघाले होते.

कोतूळ मध्ये आल्यावर गुगल मॅपवर कोतूळ राजूर राज्यामार्गाचा रस्ता असताना गुगल मॅपने कोतूळ अकोले असे दाखविल्याने हे रात्री पावणे दोन वाजेच्या सुमारास कोतूळ पुलाच्या रस्त्याने निघाले.

पावसाने रस्ता ओला होता समोर पूल असल्याचे कोणतेही फलक नसल्याने सरळ ते पिंपळगाव धरणाच्या पाण्यात गेले. तिघेही खिडकीतून बाहेर आले. दोघे जण पोहत कडेला आले मात्र चालक सतीश घुले याला पोहता येत नसल्याने तो बुडाला.

रात्रीच शोध कार्य सुरु होते, या घटनास्थळी संगमनेर पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख व अकोले पोलीस उपनिरीक्षक दीपक ढोमने घटनास्थळी दाखल झाले होते.

अहमदनगर लाईव्ह 24