गंधर्व थिटे याच्या गणितीय सूत्राला शासनाकडून मान्यता

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2020 :-अहमदनगर येथील वसंत टेकडी जवळील स्टेट बँक कॉलनी येथील गंधर्व दत्तप्रसाद थिटे या विद्यार्थ्याने संशोधित केलेल्या ‘फाईडिंग द व्हॅल्यू ऑफ ऍन इन्टीग्रल ऑफ एनी निगेटीव्ह

नंबर टू द पॉवर ऑफ द इन्टीग्रेशन व्हेरिएबल’ या गणितीय सूत्राला केंद्र शासनाच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या कॉपीराईट ऑफिसकडून नुकतीच मान्यता प्राप्त झाली आहे.

गंधर्व थिटे याच्या संशोधनामुळे गणित विषयावरील एका नवीन संकल्पनेला चालना मिळणार आहे. त्याने नुकतीच 12 वी विज्ञान शाखेची परिक्षा उत्तीर्ण झाला असून अभियांत्रिकी शिक्षणाच्या तयारीत आहे.

इंग्रजी लेखक, कवी दत्तप्रसाद अनिल थिटे आणि प्रा.सौम्या थिटे यांचा तो मुलगा आहे. त्याच्या या यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24